Kuldeep Yadav : हे स्टेडियम खूप... सेमी फायनलपूर्वी कुलदीप यादवने दिला वानखेडेच्या खेळपट्टीबाबत इशारा

सेमी फायनलपूर्वीच कुलदीप यादवने वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल दिला इशारा
Kuldeep Yadav
Kuldeep Yadavesakal

Kuldeep Yadav : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबरला वर्ल्डकप 2023 ची पहिली सेमी फायनल होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून भारतीय संघातील अनेक खेळाडूंचे हे होम ग्राऊंड आहे. दरम्यान, भारतीय संघातील डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने वानखेडे स्टेडियमबद्दल एक प्रमाणिक मत नोंदवलं.

कुलदीप यादव भारताच्या नेदरलँडविरूद्धच्या सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, 'वानखेडेची खेळपट्टी ही गोलंदाजी करण्यास कठिण असते. तेथील चेंडूला मिळणारी उसळी ही फलंदाजांना साथ देणार असते. फलंदाजांसाठी ती नंदनवन आहे.

वनडेमध्ये टी 20 क्रिकेटच्या तुलनेत गोलंदाजांना कमबॅक करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. मात्र वानखेडेवर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी तुम्हाला सुरूवातीला विकेट्स घेणे गरजेचे असते.

Kuldeep Yadav
Rohit Sharma : आपण विराट, बाबरची चर्चा करतोय मात्र रोहितसारखा... पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची स्तुतीसुमने

भारत आणि न्यूझीलंड हे 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील मॅचेस्टरमध्ये एकमेकांना भिडले होते. हा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.

कुलदीप यादव या इतिहासातील घटनाक्रमांना फारसं महत्व देत नाही. तो म्हणतो, 'न्यूझीलंडविरूद्धची सेमी फायनल ही 4 वर्षापूर्वी झाली होती. त्यानंतर आम्ही अनेक द्विपक्षीय मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे जसं भारतातील खेळपट्ट्यांबाबत आम्हाला जितकं माहिती आहे तसं ते त्यांनाही माहिती आहे. आमची तयारी पक्की आहे.'

'आम्ही संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. हीच कामगिरी आम्ही पुढच्या सामन्यात देखील करू अशी आशा आहे.'

कुलदीप यादवने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने 9 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ही 4.15 इतकी प्रभावी आहे.

Kuldeep Yadav
Virender Sehwag : सेमी फायनलआधी ICC ची मोठी घोषणा! भारतीय दिग्गज खेळाडूची 'Hall of Fame'मध्ये एन्ट्री

बाद फेरीत खेळताना येणाऱ्या दबावाबाबत कुलदीप म्हणतो की, 'मी माझ्या गोलंदाजीतील लय आणि बलस्थानावर काम करतोय. फलंदाज माझ्याविरूद्ध कशी फलंदाजी करतोय याच्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न मी करतोय. मी गुड लेंथवर जितका चांगला मारा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करतोय.'

'मी विकेट्स घेण्यापेक्षा प्रक्रियेवर जास्त फोकस करतोय. आशा आहे की ही रणनिती पुढच्या सामन्यात देखील यशस्वी ठरले.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com