esakal | "टीम मॅनेजमेंट कुलदीपकडे सवतीच्या पोरासारखं पाहते"
sakal

बोलून बातमी शोधा

Kuldeep Yadav

"टीम मॅनेजमेंट कुलदीपकडे सवतीच्या पोरासारखं पाहते"

sakal_logo
By
सुशांत जाधव

महेंद्रसिंह धोनीसोबतच चायना मॅन कुलदीपच्या कारकिर्दीलाही उतरती कळा लागलीये. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची रणनिती बदलली आणि हळूहळू ''कुलचा'' जोडी अर्थात कुलदीप आणि चहल एकत्रित खेळताना दिसायचे बंद झाले. परदेशी मैदानातील हुकमी फिरकीपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप यादवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसह इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या वनडे आणि टी-20 संघात त्याला स्थान मिळाल्यानंतर कुलदीपला लहानपणी फिरकीचे धडे देणाऱ्या कोचनी मोठी प्रतिक्रिया दिलीये. संघ व्यवस्थापन कुलदीपला सवतीच्या पोरासारखे वागवते, असे वक्तव्य कपिल देव पांड्ये यांनी केले आहे. ( kuldeep-s-childhood-coach-team-management-treated-him-step-motherly)

एका मुलाखतीमध्ये कपिल देव पांड्ये यांनी कुलदीप यादवने सरावाला सुरुवात केल्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथलता देण्यात आल्यानंतर आठवड्याभरापासून कुलदीपने सरावाला सुरुवात केलीये. आम्ही खास करुन त्याची ताकद असलेल्या गुगलीवर काम करत आहोत. ही त्याची विकेट टेकिंग डिलिव्हरी आहे. मागील काही दिवसांपासून तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसले नाही. यावर तो आता मेहनत घेत आहे. त्याच्या चेंडूत टर्नही चांगला मिळतोय.

हेही वाचा: SL vs Ind : "स्वप्न सत्यात उतरल्याचे पाहायला बाबा हवे होते"

कुलदीप हा विकेट टेकर आहे. त्याने अनेकदा धावाही केल्यात. आता तो गोलंदाजीमध्ये आणखी नवी टेक्निक आजमवण्याचा प्रयत्न करतोय. मीडल ओव्हर्समध्ये धावा रोखण्यासाठी तो आता स्टॉक डिलिव्हरीवर काम करत आहे. विकेट मिळवणे ही त्याची प्राथमिकता असेल. ते पुढे म्हणाले की, 63 वनडे सामन्यात त्याने 100 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. त्याला अधिक संधी न मिळाल्याने त्याचा आत्मविश्वास खालवला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 5 विकेट घेणाऱ्या कुलदीपला कसोटी सामन्यात संधी दिली नाही. ज्यावेळी अर्धा संघ दुखापतग्रस्त होता त्यावेळीही त्याला संधी देण्यात आली नाही. मायदेशात झालेल्या मालिकेत त्याला सर्व सामन्यात खेळवले असते तर त्याने 30 विकेट सहज घेतल्या असत्या. आयपीएलमध्ये त्याचा संघ पराभूत असताना तो बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व पाहताना टीम मॅनेजमेंट त्याच्याकडे सवतीच्या पोरासारखे पाहत असल्याचे वाटते, अशा शब्दांत पांड्ये यांनी नाराजी व्यक्त केलीये.

हेही वाचा: EURO 2020 : इटली भारी; पण तुर्कीचीही कहाणी न्यारीच!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी कुलदीपला संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही मालिकेत मिळून टीम इंडिया श्रीलंकेत 6 सामने खेळणार असून सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहेत. या मालिकेत दमदार कामगिरी करुन कुलदीप आपल्यातील क्षमता सिद्ध करेल, असा विश्वास कुलदीपच्या कोचनी व्यक्त केलाय.