
BAN vs SL : कुसल मेंडिसच्या छातीत आली कळ; त्वरित सोडलं मैदान
मिरपूर : बांगलादेश आणि श्रीलंका (Sri Lanka Vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कोसटी (2nd Test) सामन्याला आझ मिरपूर येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरू झाला. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याची 23 षटके झाली असताना अचानक श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसच्या (Kusal Mendis) छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला मैदानावरून त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले.
हेही वाचा: IPL 2022 : दहा कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंची कशी झाली कामगिरी?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 'कुसल मेडिसचा इसीजी काढण्यात आला. त्यामध्ये गंभीर असे काही आढळून आले नाही. आशा आहे की तो काही तासातच आपल्या हॉटेलमध्ये परतेल. सध्या तो निरिक्षणाखाली आहे.' कुसल मेंडिसने बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अनुक्रमे 54 आणि 48 धावा केल्या होत्या.

Kusal Mendis
हेही वाचा: टीम इंडियात सिलेक्शन उमरान मलिकचं पण कौतुक इरफान पठाणचं?
दरम्यान, कुसल मेंडिसच्या छातीत दुखू लागल्याने श्रीलंकेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याच्या चाचण्यामध्ये फारसे गंभीर असे काही आढळून आले नसल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, फुटबॉलच्या मैदानावर गेल्या काही वर्षात खेळाडूंचे अचानक ह्रदय बंद पडण्याच्या काही घटना घडल्या होत्या. डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सन (Christian Eriksen) देखील सामना सुरू असतानाच हार्ट अटॅक आल्याने तो मैदानावर कोसळला होता. अखेर डॉक्टरांनी त्याचे बंद पडलेले ह्रदय पुन्हा सूरू करून त्याचा जीव वाचवला होता.
Web Title: Kusal Mendis Suffer Chest Pain During Sri Lanka Bangladesh 2nd Test Day One
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..