Kylian Mbappe scripted history at the FIFA World Cup 2026
esakal
Kylian Mbappe breaks Messi and Ronaldo World Cup record: लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे आणि एर्लिंग हॉलंड या त्रिकुटाने पुन्हा एकदा एकाच दिवशी फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ गाजवला.. या तिघांनी आपापल्या संघासाठी प्रत्येकी दोन गोल केले आणि बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. अर्जेटिनाचा मेस्सी ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल करून वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला.. हॉलंडनेही दोन गोल करून नॉर्वेला ३-२ अशा फरकाने सेनेगलवर विजय मिळवून दिला. त्यात फ्रान्सने ३-० अशा फरकाने इराकवर विजय मिळवला. एम्बाप्पेने या सामन्यात दोन गोल केले आणि एक असा विक्रम नोंदवला, ज्यात मेस्सी व रोनाल्डो यांना त्याने मागे सोडले.