France vs Morocco: किलियन एम्बाप्पेची जादू कायम! फ्रान्स सलग तिसऱ्यांदा Fifa World Cup उपांत्य फेरीत; मोरोक्कोवर सहज विजय

Kylian Mbappe leads France to World Cup semi-final: किलियन एम्बाप्पेच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत मोरोक्कोचा २-० असा पराभव केला आणि फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयासह 'लेस ब्ल्यूज'ने सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम केला.
Kylian Mbappe leads France to World Cup semi-final

Kylian Mbappe leads France to World Cup semi-final

esakal

Updated on

France vs Morocco FIFA World Cup 2026 highlights: २०१८ च्या विजेत्या फ्रान्सने फिफ फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत मोरोक्कोला २-० ने पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 'लेस ब्ल्यूज' संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यांनी २०१८ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर २०२२ मध्ये ते उप विजेते राहिले होते. आता ते मंगळवारी डॅलस येथे स्पेन-बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या संघाशी सामना करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com