
थोडक्यात :
ऑलिम्पिक २०२८ स्पर्धा १५ जुलै ते ३० जुलैदरम्यान लॉस अँजलिसमध्ये होणार आहे.
या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश असून स्पर्धा १२ जुलैपासून सुरू होईल.
या वेळापत्रकात ३० पेक्षा जास्त खेळांचा समावेश असून अनेक स्पर्धा उद्घाटनाआधीच सुरू होतील.
बरोबर तीन वर्षांनी ऑलिम्पिक २०२८ स्पर्धेला लॉस अँजलिसमध्ये सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिक आयोजकांनी सोमवारी या स्पर्धेचे खेळांनुसार वेळापत्रक जाहीर केले आहे. गेल्याचवर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्यानंतर आता पुढच्या ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली असून वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यामुळे आता खेळाडूंना ऑलिम्पिक २०२८ साठी तयारी सुरू करतील.