Lasith Malinga MI : लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये परतणार; शेन बाँडची होणार उचलबांगडी

Lasith Malinga Mumbai Indians
Lasith Malinga Mumbai Indiansesakal

Lasith Malinga Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाची घरवापसी होणार आहे. आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये दाखल होणार आहे. मलिंगा 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सशी जोडला होता. आता तो मुंबई इंडियन्ससोबत आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहे. 39 वर्षाचा मलिंगा हा राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफचा एक सदस्य होता. आता तो वानखेडेवर परतणार असून तो शेन बाँडची जागा घेणार आहे.

Lasith Malinga Mumbai Indians
ODI World Cup 2023 Mascots : आयसीसीकडून वर्ल्डकपच्या शुभंकरचे अनावरण; नामांकरणाची जबाबदारी मात्र चाहत्यांची

लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणून 2018 मध्ये काम पाहिले आहे. मात्र तो 2019 च्या आयपीएल हंगामात मैदानावर परतला आणि जसप्रीत बुमराहसोबत मुंबईला विजेतेपद पटकावले. मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता त्यावेळी मुंबईने चारवेळा विजेतेपद पटकावले. याचबरोबर मलिंगा संघात असाताना मुंबईने चॅम्पियन्स लीग टी 20 चे टायटल देखील जिंकले होते.

Lasith Malinga Mumbai Indians
Bajrang Punia : बजरंग, दीपक पुनियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप चाचणीवर मारली फुली; मात्र नाराज SAI ने वाढवंल त्यांच टेन्शन

मात्र मलिंगा 2021 मध्ये आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर श्रीलंकेचा माजी स्टार कुमार संगकाराला साथ देण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या गोटात गेला. पहिल्या वर्षी राजस्थानने आयपीएलची फायनल गाठली. युझवेंद्र चहल आणि इतर गोलंदाजांनी मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी केली. मात्र दुसऱ्या हंगामात राजस्थानला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवू शकले नाही. मात्र मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा यांची चांगली प्रगती झाली.

Lasith Malinga Mumbai Indians
Sourav Ganguly : विराटच्या समर्थनात 'दादा' मैदानात... शोएब अख्तरला दिलं सडेतोड उत्तर

मात्र आता लसिथ मलिंगा हा मुंबई इंडियन्सकडे परतणार आहे. तो शेन बाँडची जागा घेईल. शेन बाँड हा गेल्या 9 वर्षापासून मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच होता. शेन बाँड हा 2015 मध्ये मुंबई इंडियन्सची जोडला गेला होता. त्याने रोहित शर्मा आणि महेला जयवर्धने यांच्या साथीने मुंबईसाठी मोठे योगदान दिले. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह ही जोडी आता मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज असेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com