

Ishan Kishan Team India Comeback Story
ESakal
सौरभ ढमाले: सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २० : पुण्याच्या गहुंजे मैदानात सुरू असलेला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना... झारखंडचा कर्णधार ईशान किशनने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला अन् चौकार-षटकारांची आतिषबाजी करत वादळी शतक झळकावलं... शतक झाल्याक्षणी सेलिब्रेशनसाठी त्याने बॅट उंचावली, ती स्टँडमध्ये बसलेल्या काही व्यक्तींकडे. या व्यक्ती म्हणजे भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य. ईशानने जणू या शतकातून आपल्या फॉर्मचा सांगावा सिलेक्टर्सना धाडला आणि दोनच दिवसात या शतकाचं फळ म्हणून त्याची थेट वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात एन्ट्री झाली.