VIDEO : लेहमधील सहावीत शिकणाऱ्या विराटच्या 'फॅनगर्ल'ची बॅटिंग बघाच

Leh Virat Kohli Fangirl Maqsooma Playing Cricket Video
Leh Virat Kohli Fangirl Maqsooma Playing Cricket Video esakal

Leh Virat Kohli Fangirl Maqsooma Playing Cricket Video : लेहच्या एका साध्या शाळेतील सहावीत शिकणाऱ्या मकसूमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मकसूमाचा हा व्हिडिओ आणि छोटीशी मुलाखत देखील खूप निरागस आहे.

भारतात जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येकजण कधी ना कधी क्रिकेट खेळतोच. भारतातील लहान मुले क्रिकेट बॅट आणि बॉलच्या सानिध्यातच मोठी होत असतात. मग तो भारताचा कोणताही दुर्गम भाग असू देत क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटपटूंची पोहोच तिथपर्यंत आहेच. याचीच साक्ष देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leh Virat Kohli Fangirl Maqsooma Playing Cricket Video
Mohammed Shami : शमी बुमराहची जागा घेऊ शकेल; रेकॉर्ड काय सांगतंय?

लेहमधील ही सहावीत शिकणारी मकसूमा आपल्या शाळेच्या आवारात क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ती इतक्या लिलया फटके मारताना दिसते की ही मुलगी नक्कीच पुढे क्रिकेटमध्ये आपले चांगले करिअर करू शकेल याचा अंदाज येतो.

विशेष म्हणजे या व्हिडिओतील तिचे क्रिकेटचे शॉट जितके मनाला भावतात तितकेच मकसूमाने दिलेली उत्तरेही मनात घर करून जातात. मकसूमा या व्हिडिओत म्हणते, 'माझे वडील आणि माझ्या शिक्षकांनी मला क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिले. मी विराट कोहली सारखं क्रिकेट खेळण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावत आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे मला आता थोडं थोडं क्रिकेट खेळण्यास येतं. मी अजूनही हेलिकॉप्टर शॉट कसा खेळायचा हे शिकत आहे. मी दोन धावा पळाल्यानंतर दमते त्यामुळे मला तिसरी धाव घ्यावीशी वाटत नाही. माझा आवडता क्रिकेटपटू हा विराट कोहली आहे. मी त्याच्यासारखं खेळण्याचा प्रयत्न करते.'

Leh Virat Kohli Fangirl Maqsooma Playing Cricket Video
Syed Mushtaq Ali Trophy : 'गोवेकर' अर्जुन तेंडुलकरची बलाढ्य हैदराबादविरूद्ध दमदार कामगिरी

मकसूमाचा हा निरागस व्हिडिओ लडाखमधील शालेय शिक्षण विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत लेहमधील मुले डस्टबिनला स्टम्प बनवून क्रिकेट खेळताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com