FIFA World Cup: एक क्रिकेटचा देव तर दुसरा फुटबॉलचा.. मेस्सी-सचिनचं अनोख नातं पाहून डोळ्यात येईल पाणी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

FIFA World Cup: एक क्रिकेटचा देव तर दुसरा फुटबॉलचा.. मेस्सी-सचिनचं अनोख नातं पाहून डोळ्यात येईल पाणी!

FIFA World Cup 2022 : भारतात क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्माप्रमाणे पूजला जातो, ज्याचा देव सचिन तेंडुलकरला म्हणतात. फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सीचाही असाच दर्जा आहे. भारतासह जगभरात त्यांचे चाहते आहेत. लिओनेल मेस्सीने पहिला विश्वचषक जिंकला आहे. मेस्सीच्या या विजयाचा सचिन तेंडुलकरलाही अभिमान आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये अप्रतिम संयोजन जुळून आले आहे.

हेही वाचा: Lionel Messi Wife: मॅच हाय का लगीन.. मेस्सीची ट्रॉफी उचलायला आख्ख घरदार..

सचिन आणि मेस्सी दोघेही एकाच नंबरची जर्सी घालतात. दहावा क्रमांक ही दोन्ही महान खेळाडूंची दुसरी ओळख आहे. आठ वर्षांपूर्वी मेस्सी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध पराभूत झाला होता, तर 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करत सचिनचे स्वप्न भंगले होते.

2011 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सचिनने पाकिस्तानविरुद्ध सामनावीर ठरला, तर फीफा वर्ल्ड कप 2022 क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाच्या उपांत्य फेरीत मेस्सीने सामनावीर पुरस्कार जिंकला. तेंडुलकरने अखेर 2011 मध्ये कारकिर्दीतील पहिला विश्वचषक जिंकला. मेस्सीने यावेळी त्याची सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली.

हेही वाचा: FIFA WC22: अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस! जाणून घ्या कोण किती झालं मालामाल

सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंची तुलना केली जात होती, चाहते त्यांचे मनापासून बोलत होते. अशा परिस्थितीत खुद्द सचिनही स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्यालाही मेस्सीला विश्वचषक जिंकून पाहायचे आहे, असे संकेत एका पोस्टमधून दिले. यानंतर पोस्टवर उत्तरांचा महापूर आला. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा विजय साजरा करत होता.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने फिफा विश्वचषक 2022 ची तुलना 2011 च्या क्रिकेट विश्वचषकाशी केली आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता, त्याचप्रमाणे 2011 चा क्रिकेट विश्वचषक हा विश्वविजेता सचिन तेंडुलकरचा विश्वविजेता होण्याची शेवटची वेळ होती.

त्याच्या इंस्टाग्रामवर फिफा विश्वचषक स्पर्धेतील एक छायाचित्र शेअर करत युवराज सिंगने लिहिले, "फुटबॉलचा एक अविश्वसनीय खेळ! लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनासाठी याचा अर्थ काय आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे.....