Lionel Messi in India
esakal
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सी तब्बल १४ वर्षांनंतर भारतात दाखल झाला आहे. यावेळी तो तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्याचे कोलकाता विमानतळावर आगमन झाले. चोख सुरक्षा बंदोबस्तात मेस्सी बाहेर येताच त्याला पाहण्यासाठी जमलेल्या फुटबॉल चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोलकाता मधील रस्त्यांवर ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. तसेच विमानतळ परिसरात तर फॅन्सनी तोबा गर्दी केली होती.