Lionel Messi : मेस्सीने 23 व्या मिनिटाला इतिहास रचला; 'ही' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Lionel Messi Create History
Lionel Messi Create History esakal

Lionel Messi Create History : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने फ्रान्सविरूद्धच्या फायनल सामन्यात 23 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल केला. याच मिनिटाला लिओनेल मेस्सीने इतिहास रचला. असा इतिहास फिफा वर्ल्डकप इतिहासात कोणालाही रचता आला नव्हता. आता मेस्सीने आपल्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेज, राऊंड ऑफ 16, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनलमध्ये गोल केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

Lionel Messi Create History
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला तर काय होईल; मेस्सी किती रेकॉर्ड्स मोडेल?

फिफा वर्ल्डकप 2022 च्या फायनल सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच अर्जेंटिनाने आक्रमक खेळ करत फ्रान्सवर चढाया करण्यास सुरूवात केली. अशीच एक चढाई करताना फ्रान्सच्या डेम्बेलेने अर्जेंटिनाच्या डी मारियाला डीमध्ये अवैधरित्या अडवले. याचा फटका फ्रान्सला बसला आणि अर्जेंटिनाला पेनाल्टी मिळाली.

अर्जेंटिनाकडून मेस्सीने पेनाल्टी मारली. त्याने डाव्या पायाने गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. याचबरोबर त्याने वर्ल्डकपमधील आपला सहावा गोल केला. ही त्याची एका वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच तो आता गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर देखील पोहचला आहे.

Lionel Messi Create History
Lionel Messi : मेस्सीला लागली 'दृष्ट', अर्जेंटिनातील सगळ्या चेटकीणी ट्विटरवर आल्या अन्...

अर्जेंटिनाने सामन्याच्या 23 व्या मिनिटालाच गोल करत फ्रान्सला बॅकफूटला ढकलले. यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अर्जेंटिनाचा डी मारियाने 36 व्या मिनिटाला अॅलिस्टरच्या सहाय्याने गतविजेत्यांवर दुसरा गोल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com