Lionel Messi playing football alongside Telangana Chief Minister Revanth Reddy in Hyderabad as thousands of fans cheer during the historic event.
esakal
Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!
Lionel Messi Hyderabad : जगप्रसिद्ध महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या GOAT इंडिया टूरवर आहे, ज्याची सुरुवात आज (१३ डिसेंबर) रोजी कोलकाता येथे आगमनाने झाली. लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल हे या टूरमध्ये लिओनेल मेस्सीसोबत आहेत. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर, मेस्सी संध्याकाळी हैदराबादला पोहोचला, जिथे त्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये फुटबॉल खेळला.
हैदराबादमध्ये, मेस्सीने मुलांमधील मैत्रीपूर्ण सामन्यातही भाग घेतला, ज्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील एका संघातून खेळले. त्यानंतर त्याने मुख्यमंत्री रेड्डीसोबत फुटबॉल खेळला, दोघांनीही गोलपोस्टवर चेंडू सहज मारला. सामन्यानंतर, मेस्सीने स्टेडियममध्ये जमलेल्या चाहत्यांच्या दिशेने फुटबॉल मारून त्यांचा आनंद दिला. लिओनेल मेस्सीचा भारतात मोठा चाहता वर्ग आहे.
मेस्सी कोलकात्यात दाखल झाल्यापासूनच इकडै हैदराबादेतील चाहते त्याची आतूरतेने वाट पाहत होते. ज्यामुळे मैदान हजारो चाहत्यांनी गच्च भरलेले होते. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि मेस्सी यांच्यातील फुटबॉल सामना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांनी आनंद घेतला.
हैदराबाद दौरा पूर्ण केल्यानंतर, लिओनेल मेस्सी GOAT इंडिया टूरच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत पोहचणार आहे. या ठिकाणी तो एक सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळेल, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील काही मोठे स्टार तसेच बॉलिवूड स्टार्सचा समावेश असू शकतो. आता मुंबईतील चाहते देखील या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेस्सीचा हा टूर १५ डिसेंबर रोजी दिल्लीत संपणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

