Lionel Messi Retirement
esakal
Lionel Messi announces international football retirement : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू आणि जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला लियोनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोमवारी मेस्सीने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. अर्जेंटिनाच्या जर्सीत तब्बल २० वर्षे मैदान गाजवल्यानंतर आता निवृत्ती घेत असल्याचं त्याने सांगितलं.