Lionel Messi : मेस्सी मॅजिकचा धडाका कायम; ५ सामन्यांत आठवा गोल, मियामी क्लब उपांत्य फेरीत

या सामन्यात मेस्सीने ८६ व्या मिनिटाला गोल केला. त्याचा पाच सामन्यातील हा आठवा गोल
lionel messi magic in miami again scores 8th goal in 5-games to semi finals watch
lionel messi magic in miami again scores 8th goal in 5-games to semi finals watchsakal

फोर्ट लॉडरडेला : अमेरिकेत पाऊल ठेवताच गोल करण्याचा धडाका लावणाऱ्या सुपरस्टार लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले. त्याने केलेल्या गोलाच्या जोरावर इंटर मियामी संघाने लीग कप फुटबॉल स्पर्धेत चार्लोटी संघाचा ४-० असा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली.

या सामन्यात मेस्सीने ८६ व्या मिनिटाला गोल केला. त्याचा पाच सामन्यातील हा आठवा गोल आहे. मियामी संघातून तो पाच सामने खेळला आहे आणि या पाचही सामन्यात त्याने गोल केले आहे. मेस्सीच्या आगमनानंतर मियामी संघाने एकही सामना गमावलेला नाही.

लीग कप फुटबॉल स्पर्धा ४७ संघ सहभागी झालेली स्पर्धा आहे. यात अमेरिका तसेच मेक्सिकोमधील अव्वल लीगमधील संघ खेळतात. स्पर्धेत आता केवळ चार संघ उरले असून मेस्सी आल्यामुळे मियामी क्लबचे भाग्य उजळले आहे. उपांत्य सामन्यात मियामी संघाचा सामना मेक्सिकोच्या क्वारेटारो किंवा फिलाडेल्फिया युनियन यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.

उपांत्यपूर्व सामन्यात मेस्सीसह जोसेफ मार्टिनेझ आणि रोब्रेटो थॉमस यांनीही मियामीकडून गोल केले. प्रतिस्पर्धी चार्लोटी संघाकडून करण्यात आलेल्या एका स्वयंगोलाचाही मियामी संघाला फायदा झाला. तीन गोल झाल्यानंतर सामना संपत आलेला असताना मेस्सीने आपली जादू दाखवली.

मेस्सीचा खेळ पाहण्यासाठी २२ हजार क्षमतेचे डीआरव्ही पीएनके स्टेडियम पूर्ण भरले होते. मेस्सी परिधान करत असलेली गुलाबी रंगाची १० क्रमांक असलेली जर्सी सर्वाधिक प्रेक्षक परिधान करून स्टेडियममध्ये आले होते.

मेस्सी या क्लबकडून खेळण्याअगोदर यंदाच्या मोसमात मियामी क्लब २२ पैकी केवळ पाच सामन्यांतच विजय मिळवू शकला होता. मेस्सी आल्यानंतर पुढचे पाचही सामने त्यांनी जिंकले आहे. आता विजेतेपदापासून हा संघ केवळ दोन विजय दूर आहे.

सामन्यात ३० व्या मिनिटालाही गोल करण्याची संधी मेस्सीला मिळाली होती. ६ यार्डावरून त्याने चेंडू गोलजाळ्याच्या दिशेने मारलाही होता; परंतु गोलरक्षक क्रिस्तिजन काहिल्नाने तो यशस्वीपणे अडवला. ६९ व्या मिनिटालाही गोल करण्याचे मेस्सीचे प्रयत्न थोडक्यात हुकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com