Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

Fifa Football World Cup 2026 ARG vs AUS: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये Lionel Messi याचा दबदबा कायम आहे. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात गोल करत अर्जेंटिनाच्या कर्णधाराने वर्ल्ड कप इतिहासातील एक दुर्मिळ विक्रमाशी बरोबरी साधली.
Lionel Messi Scores in Sixth Straight World Cup Match

Lionel Messi Scores in Sixth Straight World Cup Match

esakal

Updated on

Argentina vs Austria Fifa World Cup 2026: लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) ने फुटबॉल विश्वाला आपल्या कवेत घेतले आणि फिफा वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ मधील दुसऱ्याच सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. अर्जेटिंनाच्या कर्णधाराने सोमवारी ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये गोल केला आणि वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक १७ गोल त्याच्या नावावर जमा झाले. यासह त्याने आणखी एक विक्रम केला, जो मागील ५६ वर्षांत कोणालाही नव्हता जमला, तर स्पर्धा इतिहासात ९६ वर्षांत असा पराक्रम करणारा तो तिसरा खेळाडू ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com