Lionel Messi Retirement: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत! घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार, संपूर्ण परिवार उपस्थित राहणार

Lionel Messi last home World Cup qualifier: फुटबॉल जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी लवकरच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील आठवड्यात अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात होणारा वर्ल्ड कप क्वालिफायर सामना मेस्सीचा घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना ठरू शकतो.
Lionel Messi
Lionel Messiesakal
Updated on
Summary
  • लिओनेल मेस्सीने ४ सप्टेंबर रोजी व्हेनेझुएलाविरुद्धचा वर्ल्ड कप पात्रता सामना हा घरचा शेवटचा सामना असू शकतो असे संकेत दिले.

  • अर्जेंटिना आधीच २०२६ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

  • ब्यूनस आयर्समध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी मेस्सीचा संपूर्ण परिवार उपस्थित राहणार आहे. मेस्सीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १९३ सामने खेळून ३१ गोल केले आहेत.

Will Lionel Messi retire after Argentina vs Venezuela World Cup qualifier? : जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासोबतचा आपला प्रवास संपवण्याचे संकेत दिले आहेत. ३८ वर्षीय मेस्सीचे जगभरात फॅन्स आहेत आणि सध्याच्या घडीतील सर्वात यशस्वी फुटबॉलपटूंमध्ये त्याचे नाव आघाडीवर आहे. फुटबॉलच्या मैदानात नजाकतेने तो चेंडूवर ताबा ठेवतो आणि प्रतिस्पर्धीत बचावपटूंना चकवायचं कसं, हे तो अचूक जाणतो. उंची कमी असली तरी त्याने कारकिर्दीत त्याने घेतलेली भरारी ही भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. त्यामुळेच त्याच्या निवृत्तीच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसणे साहजिक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com