Lionel Messi statue : मॅरेडोना, पेले यांच्या शेजारी आता मेस्सी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi Statue

Lionel Messi Statue : मॅरेडोना, पेले यांच्या शेजारी आता मेस्सी

Lionel Messi statue : कतारमध्ये मागच्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. मेस्सीच्या कामगिरीमुळे अर्जेंटिनाने ३६ वर्षांनी फुटबॉल विश्वकरंडकावर आपले नाव कोरले.

या विश्वकरंडक विजयामुळे तो जगातील सार्वकलिक सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक ठरला आहे. त्याचा सन्मान म्हणून दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेच्या मुख्य कार्यालयात आता ब्राझीलचे दिग्गज खेळाडू पेले आणि अर्जेंटिनाचे मॅरेडॉना याच्या शेजारी आता मेस्सीचा पुतळा उभा करण्यात आला आहे. मेस्सीच्या या पुतळ्याच्या हातात विश्वकरंडकाची प्रतिकृतीसुद्धा आहे.

मेस्सीच्या पुतळ्याचे सोमवारी, उद्घाटन करण्यात आले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना मेस्सी म्हणाला, "मी लहानपणापासूनच फुटबॉल खेळायचे स्वप्न बघतिले होते. मला फुटबॉल खेळायला आवडते आणि याच आवडीमुळे मी माझ्या देशासाठी विश्वकरंडक जिंकू शकलो आहे. माझ्या कारकिर्दीत अनेक चढ- उतार आले; परंतु मेहनत घेणे सोडले नसल्यामुळे मी स्वप्नांचा पाठलाग करू शकलो. पुतळा उभा करून माझा सन्मान करण्यात आला, याचा मला अत्यंत आनंद आहे आणि याला मी माझा सन्मान समजतो."

मेस्सीच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळी अर्जेंटिनाच्या इतर खेळाडूंना आणि मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांना फुटबॉल विश्वकरंडकाची आणि २०२१ मध्ये जिंकलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेची ट्रॉफी देण्यात आली.