Lionel Messi Vs Cristiano Ronaldo : मेस्सी-रोनाल्डो लढतीची चर्चा सुरू असतानाच ख्रिस्तियानोने दिला मोठा धक्का

Lionel Messi Vs Cristiano Ronaldo : मेस्सी - रोनाल्डोच्या सामन्याकडे फुटबॉल चाहते डोळे लावून बसले होते मात्र...
Lionel Messi Vs Cristiano Ronaldo
Lionel Messi Vs Cristiano Ronaldoesakal

Lionel Messi Vs Cristiano Ronaldo : फुटबॉल जगतातील सर्व चाहते लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याकडे डोळे लावून बसले होते. रियाध सिजन कप 2024 सुरू होण्यापूर्वी इंटर मियामी आणि अल नासर यांच्यात एक मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. या सामन्यात या दोन दिग्गज फुटबॉलपटूंना एकमेकांविरूद्ध खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार होती.

मात्र या सामन्यापूर्वीच ख्रिस्तियानो रोनाल्डोने चाहत्यांना धक्का दिला. त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. अल निसारचे प्रशिक्षक युईस कॅस्ट्रो यांनी रोनाल्डोच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली.

Lionel Messi Vs Cristiano Ronaldo
Khelo India 2024 : तब्बल 158 पदकांची कमाई; 'क्रीडा राज्य' हरियाणापेक्षाही महाराष्ट्र भारी

माध्यमांशी बलोताना कॅस्ट्रो म्हणाला की, 'आपल्याला मेस्सी विरूद्ध रोनाल्डो हा सामना पाहता येणार नाही. रोनाल्डो हा दुखापतीतून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. आशा आहे की तो येत्या काही दिवसात संघात दाखल होईल आणि त्यांच्यासोबत सराव करण्यास सुरूवात करेल. मात्र तो मैत्रीपूर्ण सामन्याला मुकणार आहे.'

जरी या मैत्रीपूर्ण सामन्याला रोनाल्डो मुकणार असला तरी फुटबॉल चाहते हे या सामन्यात अनेक स्टार खेळाडूंना पाहू शकतात. यात लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ, जॉर्डी अल्बा आणि सर्गियो बुस्क्वेट्स यांचा समावेश असणार आहे.

Lionel Messi Vs Cristiano Ronaldo
India Vs England Sarfaraz Khan : सरफराज खान दुसऱ्या कसोटीत खेळणार...? प्रशिक्षक स्पष्टच बोलले

अल नासरकडून अॅलेक्स टेल्लेस, आयमेरिक लापोर्टे आणि अँडरसन टालिस्का यांचा देशील समावेश आहे. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर फुटबॉल चाहत्यांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी असणार आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com