Lionel Messi : मेस्सी आठव्यांदा ठरणार सर्वोत्तम फुटबॉलपटू?

अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आठव्यांदा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
Lionel Messi
Lionel Messisakal

नवी दिल्ली - अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आठव्यांदा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. फ्रान्समधील पॅरिस येथे उद्या (ता. ३०) बॅलोन डी ओर हा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जाणारा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरुष विभागात मेस्सी हा पुरस्कार जिंकण्यात आघाडीवर आहे. महिला विभागात स्पेनची स्टार खेळाडू एटाना बोनमाती पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहे. मागील १५ वर्षांमध्ये लियोनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या महान फुटबॉलपटूंमध्येच हा पुरस्कार विभागला गेला आहे. दोघांनी मिळून १२ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त या दरम्यान दोनच खेळाडूंना हा पुरस्कार जिंकता आला आहे.

सर्बियाचा लुका मॉड्रिच याने २०१८ मध्ये, तर फ्रान्सचा करिम बेनेंझा याने २०२२ मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. मेस्सी याने आतापर्यंत २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९, २०२१ या वर्षांमध्ये सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com