Lionel Messi missed penalty against Egypt
esakal
Fifa World Cup 2026 Argentina vs Egypt Marathi football news: लिओनेल मेस्सीची ( Lionel Messi) हुकलेली पेनल्टी अन् इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबेर ( MOSTAFA SHOUBIR) याचे अविश्वसनीय बचाव... याने फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील मंगळवारची रात्र गाजवली. अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त हा सामना नाट्यमय राहिला... मेस्सीला जखडून ठेवण्यात इजिप्तच्या बचावफळीला आलेले यश अन् त्यामुळे अर्जेंटिनाच्या इतर खेळाडूंच्या मनोधेर्याला धक्का बसलेला. पण, शेवटच्या १३ मिनिटांत अर्जेटिनाने पुनरागमन केले. मेस्सी व क्रिस्तियन रोमेरोच्या गोलने सामना २-२ असा बरोबरीत आला. ९०+२ मिनिटाला एंझो फर्नांडेजने हेडरद्वारे गोल करून अर्जेंटिनाचा ३-२ असा थरारक विजय निश्चित केला आणि गतविजेत्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश पक्का केला.