Argentina vs Cabo Verde : हॅट्स ऑफ काबो व्हर्दे... अर्जेंटिनाला विजयासाठी १२० मिनिटे झुंजवले; मुंबई, पुण्यापेक्षा लहान देश 'बाजीगर' ठरला...

Argentina vs Cape Verde Fifa World Cup 2026 : काबो व्हर्दे संघाने यंदाचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने संस्मरणीय केला.. साखळी फेरीत स्पेनला झुंजवणाऱ्या या संघाने गतविजेत्या अर्जेंटिनाचा बाद फेरीतील सामन्यात अक्षरशः घाम काढला. त्यांची हार झाली असली तरी ते खऱ्या अर्थाने आजचे नायक ठरले.
Argentina vs Cape Verde

Argentina vs Cape Verde

esakal

Updated on

Argentina vs Cape Verde Marathi Football News : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही केवळ नावासाठी आलेलो नाही, तर जगाला थक्क करण्यासाठी आलो आहोत, ५ लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या काबो व्हर्देने आपल्या कामगिरीतून हेच जगाला सांगितले... गतविजेत्या अर्जेंटिनाला त्यांनी कडवी झुंज दिली आणि फुटबॉलविश्वाला पुन्हा एकदा कौतुक करण्यास भाग पाडले. आपल्या बचावासाठी प्रसिद्ध असलेल्या या संघाने लिओनेल मेस्सीसारख्या ( Lionel Messi) दिग्गज खेळाडूला १२० मिनिटे रोखून ठेवले, यातच सर्व आले. गोलरक्षक व्होझिन्हा ( Vozinha)चा अप्रतिम बचाव, त्यात डेरॉय डुआर्टेने केलेला गोल म्हणजे काबो व्हर्देच्या चाहत्यांसाठी पर्वणीच... पण, ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात DINEY BORGES च्या स्वयंगोलने अर्जेंटिनाचा विजय निश्चित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com