आनंदची ऍडम्सशी बरोबरी

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

लंडन - भारताचा पाचवेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंद याने लंडन क्‍लासिक बुुद्धिबळ स्पर्धेत ब्रिटनच्या मायकेल ऍडम्सशी बरोबरी साधली. चौथ्या फेरीतील या लढतीत आनंदने एक सोपी संधी दवडल्यामुळे त्याची विजयाची संधीदेखील हुकली. चौथ्या फेरीत एकमात्र निकाली लढतीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवचा पराभव केला. अन्य अनिर्णित लढतींनंतर अमेरिकेच्या वेस्ली सो याने तीन गुणांसह आघाडीचे स्थान कायम राखले. फॅबिआनो कारुआना, व्लादिमीर क्रामनिक, लेवॉन अरोनियन, नाकामुरा 2.5 गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत.

लंडन - भारताचा पाचवेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंद याने लंडन क्‍लासिक बुुद्धिबळ स्पर्धेत ब्रिटनच्या मायकेल ऍडम्सशी बरोबरी साधली. चौथ्या फेरीतील या लढतीत आनंदने एक सोपी संधी दवडल्यामुळे त्याची विजयाची संधीदेखील हुकली. चौथ्या फेरीत एकमात्र निकाली लढतीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने बल्गेरियाच्या व्हॅसेलिन टोपालोवचा पराभव केला. अन्य अनिर्णित लढतींनंतर अमेरिकेच्या वेस्ली सो याने तीन गुणांसह आघाडीचे स्थान कायम राखले. फॅबिआनो कारुआना, व्लादिमीर क्रामनिक, लेवॉन अरोनियन, नाकामुरा 2.5 गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. आनंद नेदरलॅंड्‌सच्या अनिष गिरीसह दोन गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे.

Web Title: London Chess Classic

टॅग्स