
Lookback Sports 2024: साल २०२४ वर्ष संपत आले आहे. त्यामुळे आता वर्षभरात घडलेल्या घटनांचा उहापोह केला जात आहे. या संपूर्ण वर्षात अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाही पार पडल्या, त्यामुळे खेळाडूही विविध कारणांसाठी चर्चेत राहिले. या वर्षात आयसीसी टी२० क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला.
याशिवाय ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या स्पर्धाही पार पडला. कोपा अमेरिया, युरो अशा मोठ्या फुटबॉल स्पर्धा झाल्या, तर टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धाही नेहमीप्रमाणे गाजल्या. वर्षभरात झालेल्या क्रीडा स्पर्धांची आणि खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा सोशल मीडियावर रंगली.