MS Dhoni | धोनीला मॅच फिक्सिंग संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

धोनीच्या विरोधातील आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली
MS Dhoni
MS Dhoniesakal

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) दिलासा दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयात आयपीएस (IPS) अधिकारी जी. संपत कुमार यांनी धोनीच्या विरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. ही याचिका एमएस धोनीने (MS Dhoni) आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरोधात केलेल्या मानहानीचा दावा मागे घेण्याबाबत होती. आयपीएस अधिकाऱ्याची ही याचिका फेटाळताना न्यायमूर्ती एन. शेषसायी 'या स्तरावर या प्रकरणावर कोणताही आदेश देण्याने २०१४ पासून जो मुख्य खटला सुरु आहे त्याच्यावर प्रभाव पडू शकतो.' असे वक्तव्य केले. (Madras High Court Rejected IPS Officer Petition Filed Against MS Dhoni)

MS Dhoni
ऋतुराज गायकवाडचे सलग दुसरे शतक

धोनीवर २०१४ च्या आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये सट्टेबाजी(Betting), स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगमध्ये (Match Fixing) सामिल असल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात धोनीने माध्यमांवर आणि अन्य काही व्यक्तींवर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता.

MS Dhoni
Hardik Pandya | हार्दिक पांड्या निवृत्ती घेणार?

धोनीने सुरुवातीला आयपीएल (IPL) सट्टेबाजी (Betting) घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आयपीएस अधिकारी कुमार यांच्यासह अनेक लोकांना प्रतिवादी केले होते. त्यांना कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध करण्यापासून रोकावे अशी धोनीने (MS Dhoni) मागणी केली होती. धोनीचे म्हणणे होते की या याचिकेतील प्रतिवादींनी क्रिकेट चाहत्यांसमोर त्याची प्रतिमा मलिन करण्याचा उद्येश आहे. त्यावेळी न्यायाधीश एस. तमिलवनन यांनी प्रतिवाद्यांना माध्यमांमध्ये वक्तव्य करण्यापासून रोखणारा आदेश दिला होता. दरम्यान, संपत कुमार यांनी धोनीने ठोकलेल्या मानहानीच्या दाव्याविरोधात २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com