सुरवात आगळी; पण बरोबरीची कोंडी कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

न्यूयॉर्क - जागतिक बुद्धिबळ लढतीत प्रथमच विषम डावात पांढरी मोहरी लाभलेल्या आव्हानवीर सर्गी कार्जाकिनने आगळी सुरवात केली. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने चूक करीत त्याला वर्चस्वाची संधीही दिली. या १२ डावांच्या लढतीतील बरोबरीची कोंडी सातव्या डावातही फुटली नाही.

लढतीचे निम्मे डाव झाल्यानंतर मोहऱ्यांची क्रमवारी बदलते. त्यानुसार आता विषम डावात काकिनची पांढरी मोहरी असतील. त्याने यापूर्वीच्या तीन डावांप्रमाणे राजासमोरील प्यादे हलवून सुरवात करण्याऐवजी डी ४ ही सुरवातीची चाल केली. मात्र, कार्लसनने क्वीन्स गॅम्बिट स्लॅव बचावात्मक पद्धतीने सुरवात करीत कार्याकिनला वर्चस्वापासून रोखले. याचवेळी हत्तीची चुकीची चाल करीत कार्लसनने निर्णायक वर्चस्वाची संधी गमावली. 
कार्लसनने वर्चस्वाची संधी दवडल्यावर मोहरामोहरीच झाली. त्यानंतर कार्जाकिनकडे एक प्यादे जास्त होते; मात्र प्रतिस्पर्ध्याकडे असलेला उंट भिन्न रंगाच्या घरात होता. कार्जाकिनची वजिराकडील बाजू भक्कम आहे हे कार्लसनने सहज जाणले. त्याने कार्जाकिनला याचा निर्णायक फायदा होणार नाही, याकडे लक्ष दिले. मोक्‍याच्या ठिकाणी असलेले कार्जाकिनचे प्यादे अपेक्षित धोका निर्माण करीत नव्हते. अखेर प्रतिस्पर्ध्यांनी ३४ चालींतच बरोबरी मान्य केली. 

Web Title: Magnus Carlsen Vs Sergey Karjakin

टॅग्स