esakal | खेलाे इंडिया : महाराष्ट्राच्या पदकांत तिरंदाजांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

खेलाे इंडिया : महाराष्ट्राच्या पदकांत तिरंदाजांची भर

खेला इंडिया स्पर्धेत गत विजेत्या महाराष्ट्रने यंदाही पदकांमध्ये आघाडी राखली आहे. रविवार अखेर महाराष्ट्र संघाने एकूण 38 पदकांची कमाई केली. आजही (साेमवार) तिरंदाजीत तसेच रायफल शुटींमध्ये महाराष्ट्राने सरशी साधली आहे.

खेलाे इंडिया : महाराष्ट्राच्या पदकांत तिरंदाजांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आसाम, गुवाहटी : येथे सुरु असलेल्या दूस-या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पार्थ साळूंखेने कास्यपदक पटकाविले. या यशामुळे महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आजही (साेमवार) वाढ झाली आहे.

हेही वाचा - Video : माेदींच्या पुस्तकाविषयी उदयनराजे म्हणाले... 

गुवाहटी येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत रिकर्व्हमध्ये पार्थ साळुंखेने १७ वर्षांखालील गटात कास्यपदक मिळविले आहे. तसेच पुण्याच्या टिशा संचेतीने कंपाऊड राऊंडमध्ये रौप्यपदक पटकाविले आहे. याबराेबरच रत्नागिरीच्या इशा पवारने कास्यपदक मिळविले आहे. अमरावतीच्या साक्षी ताेटे हिने रिकर्व्हमध्ये कास्यपदक मिळवित महाराष्ट्राच्या पदकतालिकेत वाढ केली.

हेही वाचा -  जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत पार्थ साळुंखे चमकला

खेला इंडिया स्पर्धेत गत विजेत्या महाराष्ट्रने यंदाही पदकांमध्ये आघाडी राखली आहे. रविवार अखेर महाराष्ट्र संघाने एकूण 38 पदकांची कमाई केली. त्यापाठाेपाठ दिल्ली 23 तसेच उत्तरप्रदेशने 13 पदके मिळविली आहेत. आज (साेमवार) महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी राैप्यपदक, कास्यपदक पटकाविली आहेत. तसेच रायफल शुटींगमध्ये रुद्राक्ष पाटीलने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. 

loading image
go to top