बास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 16 जानेवारी 2019

म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात संघाचा 83-41 असा पराभव केला.

पुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा प्रभाव पाडता आला नाही. हरियाणा पाठोपाठ आज (बुधवारी) पंजाबने महाराष्ट्र संघास हरविले. सलग दूसऱ्या पराभवाने या संघाची आता तामिळनाडूच्या लढती वेळीस करो या मरोची स्थिती राहणार आहे.

म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात संघाचा 83-41 असा पराभव केला. तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या संघास हरियाणा संघाने 81-55 तर मुलींच्या संघास तामिळनाडूने 71-63 असे हरविले. यामुळे महाराष्ट्रच्या गोटात मंगळवारी कही खूशी कही गम अशी परिस्थिती होती. 

आज (बुधवार) स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाचा सामना पंजाब संघाबरोबर होता. महाराष्ट्राच्या पाठीराख्यांनी प्रेक्षा गॅलरीत मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासून पंजाबच्या खेळाडूंनी आक्रमणात भर दिली. पहिल्या दहा मिनिटांत पंजबाने 18-12 अशी सहा गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरास ही पंजाबकडे 38-20 अशी 18 गुणांची आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत पंजाबने हा सामना 72-48 असा जिंकला. महाराष्ट्र संघाच्या सलग दूसऱ्या पराभवाने प्रेक्षा गॅलरीत शांतता पसरली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या या संघाचे आव्हान टिकविण्यासाठी त्यांना आता तामिळनाडू संघाबरोबर जिंकावे लागेल अशी चर्चा क्रीडानगरीत होती.
 

Web Title: Maharashtra boys lost against punjab in basketball