आघाडीनंतर महाराष्ट्राची घसरगुंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे : मुंबई-महाराष्ट्र रणजी सामन्यात डाव सावरल्यानंतर घसरगुंडी उडण्याची मालिका आजही तिसऱ्या दिवशीदेखील कायम राहिली. महाराष्ट्राने पहिल्या डावात 79 धावांची आघाडी घेतली; परंतु दुसऱ्या डावात निम्मा संघ 112 धावांत गमावला. उद्या अखेरच्या दिवशी मुंबईकडे निर्णायक विजयासाठी प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही; परंतु सध्या तरी महाराष्ट्र 191 धावांनी पुढे आहे. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईचा पहिला डाव 273 धावांत संपुष्टात आला. कर्णधार सिद्धेश लाड शतकापासून सात धावा दूर राहिला. शुभम रांजणेसह त्याने डाव सावरला. संघाला 232 पर्यंत मजल मारून दिली; परंतु तो बाद झाल्यावर मुंबईचे अखेरचे पाच फलंदाज 41 धावांत बाद झाले.

तळाच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे सहा फलंदाज 40 धावांत माघारी फिरले होते. 

महाराष्ट्राकडून अक्षय पालकरने चार, तर फल्लाहने तीन गडी बाद केले. आघाडीबरोबर तीन गुण निश्‍चित करणाऱ्या महाराष्ट्राला स्वप्नील गुगले, चिराग खुराना यांनी अर्धशतकी सलामी दिली, तेव्हा महाराष्ट्राची मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरू होती; परंतु शिवम मल्होत्रा आणि अक्षय पारकर यांनी या सलामीवीरांना बाद केल्यावर शिवम दुबेने दोन विकेट मिळवल्या. त्यामुळे महाराष्ट्राची बिनबाद 58 वरून 5 बाद 104 अशी अवस्था झाली. खेळ थांबला तेव्हा कर्णधार राहुल त्रिपाठी 13 धावांवर नाबाद राहिला आहे. 

संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र, पहिला डाव : 352 आणि दुसरा डाव : 5 बाद 112 (स्वप्नील गुगले 37, चिराग खुराना 38, शिवम दुबे 7-2); मुंबई, पहिला डाव : 273 (आदित्य तरे 63, सिद्धेश लाड 93, शुभम रांजणे 54, फल्लाह 55-3, अक्षय पालकर 62-4)

Web Title: Maharashtra collpased against Mumbai in Ranji trophy match