esakal | शाब्बास रे पठ्ठ्या! सांगलीच्या ओंकारची क्रिकेट संघात निवड
sakal

बोलून बातमी शोधा

शाब्बास रे पठ्ठ्या! सांगलीच्या ओंकारची क्रिकेट संघात निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कामकाज सुरु आहे.

शाब्बास रे पठ्ठ्या! सांगलीच्या ओंकारची क्रिकेट संघात निवड

sakal_logo
By
- जयसिंग कुंभार

सांगली : येथील १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात येथील पोलाईट स्पोर्टस क्लबच्या ओंकार यादव याची निवड झाली आहे. प्रशिक्षक चेतन पडियार यांची १४ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेसाठी प्रथमच ही संधी मिळाली आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारनं लोकांना मारुन टाकायचं ठरवलंय का?' राणे खवळले

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सदस्य संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कामकाज सुरु आहे. ओंकारला प्रशिक्षक चेतन पंडियार, राज्य खेळाडु तरणजीत धील्लोन क्लबचे पदाधिकारी राहुल आरवाडे, युसूफ जमादार, प्रितेश कोठारी यांचे मार्गदर्शन मिळाले. येथील शिवाजी क्रिंडगाणासाठी शासनाने ३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून स्टेडीयमचा विकास होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेटला चालना मिळेल असे श्री बजाज यांनी सांगितले.

हेही वाचा: 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

loading image
go to top