Women's National Hockey Tournament : मणिपूर संघाला हरवून महाराष्ट्र उपांत्य फेरीत

गतवेळच्या उपविजेत्या आणि यजमान महाराष्ट्र संघाने मणिपूरचा २-१ असा पराभव करून महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलीगॉस मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या प्रियांका वानखेडेने नोंदवलेले दोन गोल निर्णायक ठरले.
Women's National Hockey Tournament
Women's National Hockey Tournament sakal

पुणे : गतवेळच्या उपविजेत्या आणि यजमान महाराष्ट्र संघाने मणिपूरचा २-१ असा पराभव करून महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलीगॉस मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या प्रियांका वानखेडेने नोंदवलेले दोन गोल निर्णायक ठरले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मणिपूरच्या लिली चानू मायेंगबमने गोल केला.

गतविजेत्या मध्य प्रदेश संघाने बंगालचे आव्हान शूटआऊटमध्ये ४-३ असे परतवून लावले. नियोजित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. यावेळी बंगालकडून ३० व्या मिनिटाला मॅक्सिमा टोप्पोने गोल केला.

तर मध्य प्रदेशकडून ४५ व्या मिनिटाला ऐश्वर्या चव्हाणने गोल करून बरोबरी साधली. दिपीकाने केलेल्या दोन गोलच्या जोरावर हरियानाने ओडिशाचा ४-१ असा पराभव केला. नेहा गोयल, नवनीत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Women's National Hockey Tournament
FIFA World Cup : भारत-अफगाण आज फुटबॉल सामना ; फिफा विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे लक्ष्य

ओडिशाचा एकमात्र गोल नेहा लाक्राने नोंदवला. दीपिका सोरेंग आणि संगीता कुमारीने केलेल्या गोलच्या जोरावर झारखंडने मिझोरामचे आव्हान २-१ असे परतवून लावले. मिझोरामचा एकमात्र गोल लार्लेमसियामीने नोंदवला. या स्पर्धेत उद्या (ता. २१) विश्रांतीचा दिवस असून शुक्रवारी महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश आणि हरियाना विरुद्ध झारखंड हे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com