राष्ट्रीय बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्रच्या मुलींना सिल्व्हर ; मुलांना ब्रॉंझ

राष्ट्रीय बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्रच्या मुलींना सिल्व्हर ; मुलांना ब्रॉंझ

सातारा : कटकमध्ये झालेल्या 46 व्या सबज्युनिअर (13 वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्‍यपद बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुलींनी रौप्यपदक तर मुलांनी कास्यपदक पटकाविले. या स्पर्धेतील मुलींच्या गटातील अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध तमिळनाडू यांच्यात झाला. यामध्ये महाराष्ट्र संघास 87-56 असा पराभव पत्करावा लागला.

या स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुलींनी साखळी सामन्यापासून उत्तम कामगिरी केली होती. महाराष्ट्र संघाने साखळी सामन्यात हरियाना संघास 58-48, पंजाबला 56-30, केरळला 70-47 तसेच कर्नाटक संघास 71-58 असे पराभुत केले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत मध्यप्रदेशचा 86-65 असा पराभव केला. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मुलींना दिल्लीचा 72-64 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. परंतु आज (सोमवार) दुपारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांना तमिळनाडूकडून 87-56 असा पराभव पत्करावा लागला. 

मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने कास्यपदक प्राप्त केले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यांत महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाने हरियाणा संघास अतिरिक्त वेळेत 75-73 असे हरविले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे 67-67 असे समान गुण होते. रविवारी (ता.8) सायंकाळी झालेल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघास मिझोराम संघाकडून 86-58 असा पराभव स्वीकारावा लागला होता. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रच्या मुलांनी तमिळनाडू संघाचा 84-76 असा पराभव केला होता. तत्पुर्वीच्या झालेल्या साखळी सामन्यांत महाराष्ट्र संघाने आंध्रप्रदेश संघावर 81-71, पंजाब संघावर 74-61 विजय मिळविला होता. परंतु या संघास राजस्थानाने 73-81, बिहार संघाने 70-65 असे पराभूत केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com