

Hind Kesari Wrestling
esakal
अशोक निंबाळकर
सातारा : भारतीय कुस्ती क्षेत्रात ‘हिंद केसरी’, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी या स्पर्धा मानाच्या समजल्या जातात. लाल मातीतील अस्सल कुस्तीचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्राने आतापर्यंत नऊ हिंद केसरी देण्याचा बहुमान मिळवला आहे. ही कामगिरी राज्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. महाराष्ट्र पुन्हा या किताबावर नाव कोरणार की पंजाब, हरियानाचे वर्चस्व राहणार, हे रविवारीच समजेल.