esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : 'ही तर ऑलिंपिकची शोधमोहीम' : अनिरुद्ध देशपांडे
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra_Kesari_2020

आम्ही या स्पर्धेतून जागतिक पातळीवर लढतील अशा खेळाडूंची निवड करून त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेणार आहोत.

महाराष्ट्र केसरी 2020 : 'ही तर ऑलिंपिकची शोधमोहीम' : अनिरुद्ध देशपांडे

sakal_logo
By
संपत मोरे

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : ''कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. आपल्याकडचे अनेक खेळाडू ऑलिंपिकमध्ये चमकू शकतात; पण त्यांच्या पाठीशी शक्ती उभी राहिली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही ऑलिंपिकसाठी खेळाडू शोधण्याची मोहीम आहे. इथे जे गुणवंत खेळाडू सापडतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू,'' असे महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनाचे संयोजक उद्योगपती अनिरुद्ध देशपांडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

देशपांडे म्हणाले, ''मला तशी कुस्तीबद्दल फारशी ओढ नव्हती; पण दोन वर्षांपूर्वी भूगावला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा बघायला गेलो, तेव्हा आखाड्यात पैलवान लढत असताना बघायला आलेले प्रेक्षक त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते, त्यांचे कौतुक करत होते, ते पाहून इथल्या माणसांच्या नसानसांत कुस्ती भिनलेली आहे, हे मला जाणवले.

- महाराष्ट्र केसरी 2020 : आखाडा बनविण्यासाठी लिंबू-कापूर-ताक-तेल 

कुस्ती गावोगावी आहे. कुस्ती आवडणारा माणूस घराघरात आहे. पण, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर जेवढे यश मिळायला हवे तेवढे मिळत नाही. महाराष्ट्रातील खेडोपाड्यांतून कष्टकऱ्यांची पोरं कुस्तीत करिअर करण्यासाठी झगडत आहेत. त्यांना ऑलिंपिकपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. आम्ही या स्पर्धेतून जागतिक पातळीवर लढतील अशा खेळाडूंची निवड करून त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेणार आहोत.''

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती