दोस्तीत दोस्ती अन् कुस्तीत कुस्ती! माऊली अन् सिकंदर कुस्तीप्रेमींसाठी ठरले हृदयकेसरी

सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे या दोन जिवाभावाच्या मित्रांनी कुस्तीचं शिवधनुष्य अगदी लिलया पेललं.
Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022Sakal

Maharashtra Kesari 2022: दोस्तीत कुस्ती करणारे तर अनेकजण असतात, पण दोस्तीत दोस्ती आणि कुस्तीत कुस्ती हा मेळ साधणं अनेकांना जमत नाही. परंतु सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे या दोन जिवाभावाच्या मित्रांनी मात्र हे शिवधनुष्य अगदी लिलया जपलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेखने माऊलीवर विजय मिळवला खरा, परंतु जल्लोष केला नाही तर माऊलीच्या पायाला हात लावून त्याचा आशिर्वाद घेतला. माऊलीनेही आपल्या जीवाभावाच्या मित्राचा हेवा केला नाही तर त्याला छातीशी धरलं अन् तमाम कुस्तीप्रेमींची मनं जिकंली. (Friendship of Mauli jamdade and Sikandar Sheikh)

एवढेच नाही तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान हे दोघेही एकमेकांना चिअर करायचे. मधल्या ब्रेक दरम्यान एकमेकांचं मालिश करायचे. या चुका टाळ, असं खेळत एकमेकांना सांगायचे. प्रत्यक्ष आखाड्यात खेळणाऱ्यापेक्षा आखाड्याबाहेर उभ्या असलेल्या पैलवानाकडेच कुस्तीप्रेमींच लक्ष असायचे. माऊली आखाड्यात असताना सिंकदरचे आखाड्याबाहेरचं वातावरण पेटवायचा तर सिकंदर खेळताना माऊली त्याला चिअर करत होता.

महाराष्ट्र केसरीची गदा पटकवायचं या दोघांचेही स्वप्न अधुरे राहिलं पण या दोघांच्या दोस्तीने सर्वांची मने जिंकली. महाराष्ट्र केसरी किताब मिळो ना मिळो या दोघांना दोस्तीचा केसरी नक्कीच जिंकला.

Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022: गतविजेता हर्षवर्धन सदगीरला पराभूत; हर्षद कोकाटे, पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीत

सिकंदर मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा...पण तो वाशिम जिल्ह्याकडून खेळत आहे. हमाली करून कुस्ती खेळणारे प्रसिद्ध पैलवान रशिद शेख यांचा हा मुलगा...५० रुपयांपासूनच्या जोडापासून सुरु झालेला त्याचा प्रवास आता महाराष्ट्र नाही तर देश अनुभवत आहे. देशभरातील पैलवान महाराष्ट्रातील पैलवानांना आव्हान द्यायचे पण सिकंदरच्या रुपाने महाराष्ट्रातील मल्ल उत्तर भारतातील मल्लांना आव्हान देत आहे.

तर दुसरीकडे ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील चिलाईवाडीचा... तो सध्या अमरावतीकडून खेळत आहे. पंढरपूर येथे विठ्ठल आखाड्यात सराव करणाऱ्या पैलवान माऊलीवर गंगावेस तालमीचे वस्ताद विश्वास हारूगले यांची नजर पडली आणि त्याचं नशिबचं पालटलं. गंगावेश तालमीमध्ये तो सराव करू लागला. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्यासाठी माऊली अखंड मेहनत घेत आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान हे दोघेही एकमेकांना चिअर करायचे. मधल्या ब्रेक दरम्यान एकमेकांचं मालिश करायचे. या चुका टाळ, असं खेळत एकमेकांना सांगायचे. प्रत्यक्ष आखाड्यात खेळणाऱ्यापेक्षा आखाड्याबाहेर उभ्या असलेल्या पैलवानाकडेच कुस्तीप्रेमींच लक्ष असायचे. माऊली आखाड्यात असताना सिंकदरचे आखाड्याबाहेरचं वातावरण पेटवायचा तर सिकंदर खेळताना माऊली त्याला चिअर करत होता.

महाराष्ट्र केसरीची गदा पटकवायचं या दोघांचेही स्वप्न अधुरे राहिलं पण या दोघांच्या दोस्तीने सर्वांची मने जिंकली. महाराष्ट्र केसरी किताब मिळो ना मिळो या दोघांना दोस्तीचा केसरी नक्कीच जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com