Maharashtra Kesari 2022: गतविजेता हर्षवर्धन सदगीरला पराभूत; हर्षद कोकाटे, पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीत

गतविजेता हर्षवर्धन सदगीर यांचा पुणे शहरच्या हर्षद कोकाटे याने पराभवाचा धक्का दिला.
Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022sakal

सातारा : गतविजेता हर्षवर्धन सदगीर यांचा पुणे शहरच्या हर्षद कोकाटे याने पराभवाचा धक्का दिला. पूर्ण वेळेत हर्षदने सात विरुद्ध पाच गुण फरकाने त्याला पराभूत केले. उपांत्य फेरीतच हर्षवर्धनचे आव्हान संपुष्टात आले. त्याला स्पर्धेबाहेर काढल्यानंतर हर्षदच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. यासह हर्षद कोकाटे याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Maharashtra Kesari 2022: defending champion Harshvardhan Sadgir; Harshad Kokate wins)

Maharashtra Kesari 2022
महाराष्ट्र केसरी बाळा रफिकला पराभवाचा धक्का

अनंत अडचणींवर मात करत आखाडा पूर्ववत करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेस सुरुवात करण्यात संयोजकांना यश आलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपांत्य फेरीला सुरुवात झाल्यानंतर हर्षवर्धन सदगीर आणि हर्षद कोकाटे यांची कुस्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगली. सुरुवातीला दोन्ही पैलवान 2-2 अशी बरोबरीत कुस्ती चालली होती. पण मोक्याच्या क्षणी हर्षद कोकाटेनं उत्कृष्ट कुस्ती करत हर्षवर्धन सदगीरवर 7-5 असा विजय मिळवला. यासह गतविजेता हर्षवर्धन सदगीरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर हर्षद कोकाटेने गादी विभागात अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र केसरी गट गादी विभागाची अंतिम फेरी हर्षद कोकाटे पुणे विरुद्ध पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांच्यामध्ये होईल.

Maharashtra Kesari 2022
साताऱ्यात 'महाराष्ट्र केसरी'ला आखाडा पूजनानं सुरुवात

पृथ्वीराज पाटीलही अंतिम फेरीत-

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे.

बीडचा अक्षय विरुद्ध कोल्हापूरचा पृथ्वीराज यांच्यातील लढतीत पहिल्या मिनिटात दोन्ही पैलवानांना एकही गुण मिळवता आला नाही. अक्षय संथगतीने लढत करत असल्याने पृथ्वीराजला एक गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर पृथ्वीराजने अक्षयवर ताबा घेत दोन गुण मिळवले. पहिल्या फेरीत ३-० असा गुणफलक होता. दुसऱ्या फेरीत अक्षयने दोन गुण मिळवले.

ही लढत पृथ्वीराजने सहा विरूद्ध चार गुण फरकाने जिंकली. नाशिकचा हर्षवर्धन विरुद्ध हर्षद यांच्यातील कुस्ती लढत प्रेक्षणीय झाली. हर्षवर्धनने सुरवातीला एक गुण मिळविला. त्यानंतर दोघे आक्रमक झाले. हर्षवर्धनने पुन्हा दुसरा गुण घेतला. अक्षयने एकेरी पटावर दोन गुणांची कमाई केल्याने पहिल्या फेरीत २-२ असे गुण झाले. दुसऱ्या फेरीत हर्षदने एक गुण मिळवला. त्याने हर्षवर्धनला गुण मिळू देण्याची संधी दिली नाही.

त्यानंतर हर्षदने हर्षवर्धनवर पकड घेत दोन गुण मिळवले. हर्षवर्धनने तीन गुण मिळवून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. हर्षदने दोन गुण मिळवून सात गुणांवर आघाडी घेतली. पूर्णवेळेत हीच स्थिती राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com