

Maharashtra Kesari
esakal
वाघोलीः ६८व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) नेत्रदीपक लढती झाल्या. बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्र गायकवाड, अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने नेत्रदीपक विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बाळू बोडकेने माउली जमदाडे याचा धक्कादायक पराभव केला. त्यामुळे जमदाडेचे आव्हान संपुष्टात आले.