Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी बाळा रफीकला पराभवाचा धक्का | Bala Rafik Shaikh Lost To Vishal Bankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari

महाराष्ट्र केसरी बाळा रफिकला पराभवाचा धक्का

सातारा : साताऱ्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेत अजून एक प्रबळ दावेदार चितपट झाला. महाराष्ट्र केसरी बाळा रफिक शेखचा (Bala Rafik Shaikh) मुंबई पूर्वचा खेळाडू विशान बनकरने एकतर्फी पराभव केला. विशाल बनरकरने बाळा रफिकचा 13 - 3 अशा गुणफरकाने पराभव केला.

हेही वाचा: DC vs LSG : वॉर्नरवर बिश्नोईचे 4 बॉल पडले होते भारी! आज काय होणार?

यापूर्वी, साताऱ्याच्या किरण भगतचं (Kiran Bhagat) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलंय. महाराष्ट्र केसरीच्या माती विभागात गोंदियाच्या वेताळ शेळकेनं किरण भगतला ४-३ असं एका गुणानं हरवून खळबळजनक निकालाची नोंद केली. २०१७ साली महाराष्ट्र केसरीचा उपविजेता ठरलेल्या किरणकडून यंदा मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण, महाराष्ट्र केसरीचं आयोजन त्याच्या मायभूमीत साताऱ्यात करण्यात आलं आहे.

हेही वाचा: IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार

वातावरणात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळं साताऱ्यात (Satara) सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari) स्पर्धेतील आजपासून (गुरुवार) सकाळच्या सत्रात होणाऱ्या सर्व लढती रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं (Maharashtra Wrestling Council) घेतला आहे.

Web Title: Maharashtra Kesari Bala Rafik Shaikh Lost To Vishal Bankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..