
- नवनाथ खराडे
महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीतून अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडेचे आव्हान संपुष्टात आले, तर वाशिमचा बाला शेख याने विजय मिळवत केसरीच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली. यजमान अहिल्यानगरच्या युवराज चव्हाणने नेत्रदीपक कुस्ती करीत विजयी सलामी दिली.
दुसरा मल्ल अभिमन्यू घुलेला पराभवास सामोरे जावे लागले. गादी विभागातून शिवराज राक्षे याने विजय मिळवत दावेदारी कायम ठेवली. आता आज (ता. १) उपांत्य फेरीच्या लढती रंगणार आहेत.