'महाराष्ट्र केसरी'ची जय्यत तयारी; मुख्यमंत्र्यांनी केलं लोगोचं अनावरण : Maharashtra Kesari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'ची जय्यत तयारी; मुख्यमंत्र्यांनी केलं लोगोचं अनावरण

पुणे : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अशा 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा थरार येत्या १० जानेवारीपासून पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन उपस्थितीत होते. (Maharashtra Kesari Wrestling Competition Unveiling logo by CM Eknath Shinde)

हेही वाचा: Alt News Zuber: पोक्सो गुन्ह्याप्रकरणी झुबेरला मोठा दिलासा! दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात मांडली भूमिका

म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहोळ म्हणाले, "स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या 'महाराष्ट्र केसरी'चं आयोजन यंदा मोहोळ कुटुंबीयांकडे आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, कोथरूड येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण झालं याचा आनंद होत आहे"

हेही वाचा: Pandharpur: विठ्ठलाला अर्पण केलेले पोतंभर दागिने निघाले खोटे! काय घडलाय प्रकार वाचा

यावेळी आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीळ मुळीक, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते पै. विलास कथुरे, पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले, पै. गणेश दांगट, पै. माऊली मांगडे, पै. कृष्णा बुचडे, पै. संतोष माचुत्रे आदी उपस्थित होते.