आजपासून रंगणार आखाडा... महाराष्‍ट्र केसरीला साताऱ्यात सुरुवात

स्‍पर्धेचे उद्‌घाटन सायंकाळी ५ वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते होणार
Maharashtra Kesari
Maharashtra KesariSakal

सातारा : येथे महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातील मल्‍ल दाखल होण्‍यास सुरुवात झाली असून, या स्‍पर्धेचे उद्‌घाटन मंगळवारी सायंकाळी ५ वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई व इतर मान्‍यवर उपस्‍थित राहणार असल्‍याची माहिती राज्‍य कुस्‍तीगीर परिषद आणि जिल्‍हा तालीम संघाच्‍या वतीने संयुक्‍त पत्रकार परिषदेत देण्‍यात आली.(Maharashtra Kesari News)

स्‍पर्धेचे उद्‌घाटन मंगळवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तब्‍बल ६१ वर्षांनंतर महाराष्‍ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आणि कुस्‍तीगीर परिषदेचे अध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्‍यामुळे मिळाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्‍पर्धेत विविध वजनी गटात सकाळी आणि संध्‍याकाळच्‍या सत्रात कुस्‍त्‍या होणार आहेत.’’

यासाठी मातीचे दोन; तर गादी प्रकारातील आखाडे तयार करण्‍यात आले आहेत. या आखाड्यांच्‍या मदतीने दररोज दोन सत्रांत कुस्‍त्‍यांची रंगत सातारकरांना पाहावयास मिळणार असून, ५५ हजार प्रेक्षक एकावेळी या कुस्‍त्‍या पाहू शकणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था केल्‍याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले.

माती उकरण्याचे काम ४० मजूरांकडे

कुस्‍तीसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या आखाड्यात झालेल्‍या कुस्‍तीनंतर माती उकरण्‍यासाठी २० मजूर नेमण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक कुस्‍तीनंतर आवळलेली, घट्ट झालेली माती उकरण्‍याचे हे काम या मजुरांना करावे लागणार आहे.

जेतेपदासाठी दावेदार

मूळचा पुण्याचा, पण आता मुंबई जिल्ह्याकडून खेळणारा आदर्श गुंड हा गादी विभागातून खेळतो. सिकंदर शेख हा वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. माऊली जमदाडे, मुंबई शहरचा भारत मदने, समाधान पाटील, दत्ता नरळे, मुंबई शहर पश्‍चिमचा अक्षय गरुड हे मल्ल या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपदासाठी दावेदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com