महाराष्ट्राचे रणजीपटू राजू भालेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे - महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे.  

पुणे - महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजू भालेकर (वय ६६) यांचे शनिवारी (ता. १४) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि नात असा परिवार आहे.  

मधल्या फळीतील फलंदाज भालेकर यांनी आपल्या कारकिर्दीत ७४ सामन्यांत ३९.१६च्या सरासरीने सात शतके आणि १८ अर्धशतकांसह ३८७७ धावा केल्या. रणजी करंडक स्पर्धेतील महाराष्ट्राच्या यशात त्यांचा बहुमोल वाटा होता. निवृत्तीनंतरही ते क्रिकेटशी कायमच जोडलेले राहिले. महाराष्ट्रातील क्रिकेटविषयी ते नेहमीच अभिमानाने बोलायचे. महाराष्ट्र सरकारने त्यांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते. रणजी करंडक निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. येथील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट विभागाचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. भालेकर यांनी आपल्या कारकिर्दीत क्षेत्ररक्षणाचे महत्त्व पटवून देताना आपल्या संघाला तसे घडवले होते. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र संघ खऱ्या अर्थाने अष्टपैलू होता. 

राजू भालेकर मात्र गेले काही दिवस आजारी होते. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. शनिवारी रात्रीच वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आजी माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट संघटक यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Web Title: Maharashtra Ranji player Raju Bhalaker passes away