
पुरुष विभागात मुंबई उपनगर-पुणे यांच्यामध्ये अजिंक्यपदाची लढत रंगणार असून महिला विभागात धाराशिव-सांगली हे संघ जेतेपदासाठी एकमेकांना झुंज देणार आहेत.
अहिल्यानगर, शेवगाव येथील खंडोबा मैदानावर हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सुरू आहे. विशाल भिंगारदिवे (सांगली), नंदिनी धुमाळ (मुंबई), मंदार कोळी (ठाणे), जगदीश दवणे (पालघर) ही निवड समिती या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवड करणार आहेत.