Maharashtra State School Chess Championship: पहिल्याच फेरीत अग्रमानांकितांचा धडाका, तर बिगरमानांकित खेळाडूंनी दिलं तगडं आव्हान

Maharashtra State School Chess Championship, Mumbai : मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ३८७ युवा खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्या फेऱ्यांमध्ये मानांकित खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तसेच बिगरमानांकित खेळाडूंनी चांगले आव्हान दिले.
Maharashtra State School Chess Championship

Maharashtra State School Chess Championship

Sakal

Updated on: 

Maharashtra State School Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर अचूक चाली, आक्रमक डावपेच आणि विजयासाठीची जिद्द दाखवत मानांकित युवा बुद्धिबळपटूंनी महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात धडाकेबाज सलामी दिली.

पहिल्याच दोन फेऱ्यांत अनेक अग्रमानांकितांनी सलग विजय नोंदवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, कमी मानांकनाच्या आणि बिगरमानांकित खेळाडूंनीही दिग्गजांना आव्हान देत स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.

Maharashtra State School Chess Championship
Russia Chess Championship: आंबेगावच्या अन्वी हिंगेची रशियात चमक! आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक, ऐतिहासिक कामगिरी..
Loading content, please wait...