
गया : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये जलतरण या खेळात उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी आठ पदकांवर मोहर उमटवली. आदिती हेगडे हिचा जलतरणातील ‘सूर’ कायम राहिला. तिने सुवर्णपदकांच्या हॅट्ट्रिकसह पाच पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली.