महाराष्ट्राचा संघ सज्ज! 'या' दिवशी नवी दिल्लीत रंगणार खो-खो स्पर्धेचा थरार

नवी दिल्लीमध्ये २८ मार्च ते १ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्राचा संघ सज्ज! 'या' दिवशी नवी दिल्लीत रंगणार खो-खो स्पर्धेचा थरार
महाराष्ट्राचा संघ सज्ज! 'या' दिवशी नवी दिल्लीत रंगणार खो-खो स्पर्धेचा थरारSakal

मुंबई : नवी दिल्लीमध्ये २८ मार्च ते १ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राच्या संघांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंनी १९ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत के. के. एम. कॉलेज, मानवत, जि. परभणी येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी व्हावे,

अशी सूचना सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी दिली. तसेच सराव शिबिराच्या शेवटी कर्णधारांची निवड घोषित केली जाईल, असेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले. निवड झालेल्या खेळाडूंनी मॅट शूज, आधार कार्ड व २ फोटो सोबत आणावेत. परभणी जिल्हा हौशी खो-खो संघटनेचे सचिव पवन पाटील यांच्याशी (मो. ७५८८५७२९९९) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरुष विभाग : प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, ऋषिकेश मुर्चावडे, निखिल सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुंबई उपनगर), दिलीप खांडवी (नाशिक),

लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ, सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशीव), शुभम जाधव (परभणी). राखीव : वेदांत देसाई (मुंबई), गजानन शेंगाळ (ठाणे), सूरज लांडे (सांगली). प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे). सहाय्यक प्रशिक्षक : पवन पाटील (परभणी). व्यवस्थापक : अनिल नलवाडे (परभणी).

महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे), गौरी शिंदे, संपदा मोरे, ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशीव),

पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली), मिताली बारसकर (मुंबई उपनगर). राखीव : अपेक्षा सुतार (रत्नागिरी), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), निशा वैजाल (नाशिक). प्रशिक्षक : प्रवीण बागल (धाराशीव). सहाय्यक प्रशिक्षक : प्राची वाईकर (पुणे). व्यवस्थापिका : वैशाली सावंत (परभणी).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com