
शनिवारी तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. एकाच दिवसात ६ सुवर्णपदके भारतीय खेळाडूंनी आपल्या नावावर केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या मराठमोळ्या तेजस शिरसे याचाही समावेश आहे.
तेजस गेल्या काही वर्षापासून भारताचे प्रतिनिधित्व करत असून आता त्याने तैवानमध्येही भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.