
Vaishnavi Adkar tennis
Sakal
नवी दिल्लीतील डीएलटीए कॉम्प्लेक्स येथे सोमवारपासून सुरु झालेल्या ३० व्या फेनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर आणि कर्नाटकच्या एस. डी. प्रज्वल देव यांनी आपापल्या गटात विजयी सुरुवात केली.
महिला एकेरी गटात खेळतांना, महाराष्ट्राच्या वैष्णवीने पहिल्या फेरीच्या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. तिने तामिळनाडूच्या मिरुधुला पलानिवेलवर ६-२ व ६-४ असा सहज विजय मिळवत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. याचवेळी दुसऱ्या मानांकित प्रज्वलने पुरुष एकेरी गटात दिल्लीच्या सार्थक सुदेनचा ६-२ व ६-१ असा पराभव केला.