अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

भुवनेश्वर : भुवनेश्वर येथे पार पडलेल्या खुल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सेनादलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने पुरूषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत 37 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत सुवर्णपदक जिंकले.

बीड जिल्ह्यातील आष्टी गावचा असलेल्या 24 वर्षीय अविनाश ने शर्यत सुरू होताच आघाडी घेतली आणि 8 मिनीटे 29.80 सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदविला. रशियन प्रशिक्षक  निकोलाय यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अविनाशने गोपाल सैन्नी यांनी 1981 मध्ये केलेला 8 मिनिटे 30.88 सेकंदाचा विक्रम इतिहास जमा केला. गेल्यावर्षी चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर दुखापतीमुळे फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दुखापतीनंतर पुनरागमन करताना राष्ट्रीय विक्रम केल्याचा आनंद आहे, असे त्याने सांगितले.

Web Title: Maharashtras Avinash Sable bagged the gold medal at the Athletics Championships