IND vs BAN
IND vs BANesakal

IND vs BAN : सलमीवीरांनी घाम फोडला अखेर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या मुसक्या आवळल्या

Published on

India Vs Bangladesh World Cup 2023 : भारतीय गोलंदाजांनी आज पुण्याच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 256 धावात रोखले. बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दासने 66 तर तन्जिद हसनने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत दमदार सुरूवात करून दिली होती. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये महोम्मदुल्लाने आक्रमक 46 धावांची खेळी केली.

मात्र त्यानंतर भारतीय फिरकीने बांगलादेशला एका पाठोपाठ एक धक्के दिले. शेवटच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना वेसन घातले. भारताकडून रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

IND vs BAN
IND Vs BAN World Cup : विराटचे वर्ल्डकपमधील पहिले शतक; भारताचा विजयी चौकार

वर्ल्डकप 2023 मध्ये आज पुण्यात होत असलेल्या भारताविरूद्धच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पुण्याच्या फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. लिटन दास आणि तन्जिद हसन यांनी 93 धावांची सलामी दिली. अखेर 51 धावा करून अर्धशतक करणाऱ्या तन्जिदला कुलदीप यादवने पायचीत पकडले. त्यानंतर लिटन दासने अर्धशतक ठोकत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

IND vs BAN
IND vs BAN Video : डबल ओव्हर थ्रो! विराटनं शार्दुलकडं पाहिलं... चाहत्यांनी तर डोक्यालाच हात लावला

मात्र रविंद्र जडेजाने सलग दोन विकेट्स घेत बांगलादेशची मधली फळी उडवली. यात 66 धावा करणाऱ्या लिटन दासचा देखील समावेश होता. सिराजने देखील मेहदी हसन मिराजला बाद करत बांगलादेशची अवस्था 4 बाद 134 धावा अशी केली.

यानंतर मुस्तफिकूर रहीम आणि तोहिद ह्रदोय यांनी डाव सावरला. मात्र तोहिद 16 धावांचीच भर घालून बाद झाला. शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडली. त्यानंतर रहीमने संघाला 200 पार पोहचवले. मात्र बुमराहने त्याची खेळी 38 धावांवर संपवली. स्लॉग ओव्हरमध्ये मोहम्मदुल्लाने 36 चेंडूत 46 धावा करत बांगलादेशला 250 धावांच्या पार पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com